आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, नाशिक, कोकण शिक्षक- पदवीधरची निवडणूक जाहीर, 25 जूनला मतदान तर 28 ला निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निर्वाचन आयोगाने गुरूवारी (24 मे) जाहीर केला. त्यानुसार या चार विधानपरिषदेच्या जागांसाठी येत्या 25 जून रोजी मतदान होईल तर 28 जून मतमोजणी होईल. 

या निवडणुकीसाठी आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली असून, 7     जूनपर्यंत अर्ज दाखल करता येतील. तर 11 जूनपर्यंत आपले अर्ज मागे घेता येतील.

 

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून अपक्ष प्रा. डॉ. अपूर्व प्रशांत हिरे हे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करत आहेत. तर मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातून लोकभारती पक्षाचे व आता जेडीयूमध्ये गेलेले कपिल पाटील प्रतिनिधित्व करत आहेत.

 

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीतून आजच भाजपमध्ये गेलेले निरंजन डावखरे प्रतिनिधित्त्व करत आहेत तर मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघातून राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक रामचंद्र सावंत हे प्रतिनिधित्त्व करत आहेत. या चारही आमदारांची 7 जुलै 2018 रोजी मुदत आहे. 

 

उन्हाळी सुट्टीमुळे पुढे ढकलली होती निवडणूक-

 

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची 8 जून रोजी निवडणूक होणार होती मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. मे महिन्याची उन्हाळी सुट्टी लक्षात घेत निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त मुंबई बाहेर गेलेले शिक्षक, पदवीधर मतदानापासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार भारत निर्वाचन आयोगाने या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या निवडणुकीचे वेळापत्रक....

बातम्या आणखी आहेत...