आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील करतात किराणा मालाच्या दुकानात काम, मुलगा झाला BARC मध्ये वैज्ञानिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचे डायरेक्टर कमलेश नीलकंठ व्यास आणि कृष्णस्वामी विजय राघवन यांच्या हस्ते मयूरला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. - Divya Marathi
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचे डायरेक्टर कमलेश नीलकंठ व्यास आणि कृष्णस्वामी विजय राघवन यांच्या हस्ते मयूरला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

मुंबई/जळगाव- भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (BARC) मध्ये वैज्ञानिक असणाऱ्या मयूर पाटील याला महत्वपूर्ण संशोधनासाठी नुकतेच पदक मिळाले आहे. "सेपरेशन ऑफ अक्टिनाइड फ्रॉम स्पेंट फ्यूल अॅन्ड आउटस्टॅडिंग केमिकल सायन्स" या विषयात केलेल्या संशोधनासाठी BARC ची टीम कार्यरत होती त्यात मयूरचा समावेश होता. केंद्र सरकारने या टीमच्या सर्व सदस्यांबरोबरच मयूरचाही सुवर्णपदक देत सन्मान केला आहे. मयूरचे वडील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे किराणा मालाच्या दुकानात ते काम करतात. 

 

 

मुलाला वैज्ञानिक करण्यासाठी वडीलांनी केले स्ट्रगल
- भाभा भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचे डायरेक्टर कमलेश निलकंठ व्यास आणि कृष्णस्वामी विजय राघवन यांच्या हस्ते मयूरला सन्मानित करण्यात आले. 
- मयूरचे वडील भगवान पाटील हे मुळचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील आहेत. काही वर्षांपुर्वी ते अमळनेर येथील मिलमध्ये मजूर होते. पण मिल बंद झाल्याने त्याची नोकरी गेली. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली. त्यावेळी त्यांना अमळनेर येथील एका किराणा मालाच्या दुकानात लिपिकाचे काम मिळाले.
- तीन मुलांचे शिक्षण आणि संगोपन त्यांच्यासाठी अतिशय अवघड बाब झाली होती. त्यातच मयूरचे वैज्ञानिक होण्याचे स्वप्न होते. मयूरचे हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पाटील दाम्पत्याने खूपच कष्ट घेतले. मयूर यांचे वडील त्यासाठी दोन ठिकाणी नोकरी करत होते. मयूर वैज्ञानिक झाल्यावर आजही ते नोकरी करत आहेत. 

 

 

मयूरने असे पुर्ण केले शिक्षण
- मयूरने अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयातून दहावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर प्रताप महाविद्यालयातून शिक्षण घेतले. नॅनो वैज्ञानिक असणाऱ्या डॉ. एल. ए. पाटील यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मयूरने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एमएसस्सी केले. एसएसस्सी केल्यावर मयूरने BARC ची परीक्षा दिली. या परीक्षेत उत्तीर्ण होत त्याने अव्वल स्थान मिळवले. तो आता वैज्ञानिक बनला आहे. मयूर वैज्ञानिक बनल्यानंतर त्यांनी आता स्वत:चे घर घेतले आहे. मुलाच्या या यशाच्या त्याच्या वडिलांना सर्वाधिक आनंद झाला आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...