आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shivsena विरोधकांच्या गोटात? कुमारस्वामींचे उद्धव ठाकरेंनाही शपथविधीचे निमंत्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कर्नाटकात एचडी कुमारस्वामी हे आज सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी भाजप सोडून देशभरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना व त्यांच्या नेत्यांना देवेगौडा कुटुंबियांनी निमंत्रण दिले आहे. यात सध्या केंद्र सरकारसह राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षालाही आमंत्रित केले आहे. 

 

कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आजच्या सोहळ्याला निमंत्रित केले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांचा पालघरचा पुढील तीन दिवस भरगच्च प्रचार सभांचा धडाका असल्याने ते उपस्थित राहणार नाहीत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी कुमारस्वामी यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. तसेच या दोघांत काही वेळ संवाद झाला. शिवसेनेचा भाजपला खासकरून मोदी-शहा या दुकडीला मागील चार वर्षापासून कायमच लक्ष्य केले आहे. याची चर्चा देशभर होत असून, भाजप विरोधी पक्ष त्यामुळेच अलीकडच्या काळात शिवसेनेच्या संपर्कात राहत आहेत. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे हे मोदी- शहांला धडा शिकविण्यासाठी विरोधकांशी संधान साधणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

कुमारस्वामी यांनी उद्धव ठाकरेंना निमंत्रित करतानाच यूपीएच्या चेअरपर्सन सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा राहुल गांधी, बसपा प्रमुख मायावती, सपा प्रमुख अखिलेश यादव, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलगंणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, लालूपुत्र तेजस्वी यादव, डाव्या पक्षाचे सीताराम येचूरी, राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार, राष्ट्रीय लोकदलचे प्रमुख अजित सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुखचे एम के स्टॅलिन, अभिनेते व रजनीकांत, केरळचे मुख्यमंत्री के. विजयन यांच्यासह देशभरातील अनेक बड्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...