आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy Fathers Day: असा सुरू झाला फादर्स डे, वाचा यामागची प्रेरक कहाणी....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जगभरात जून महिन्यातील तिस-या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. त्यानुसार रविवारी (17 जून) जगभर फादर्स डे मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. लहानथोरांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजणांनी आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करून फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. पण हा फादर्स डे कधी, कोणी व का सुरू केला याची तुम्हाला माहिती आहे काय? चला तर मग जाणून घेऊया....

 

असा सुरू झाला फादर्स डे-

 

- वॉशिंग्टनमधील स्पोकेन शहरातल्या एका तरुणीने सर्वप्रथम 19 जून 1910 रोजी फादर्स डे साजरा केला होता. 


- कारण आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी तिचे पालनपोषण केले होते. त्यामुळे या तरुणीला जसा मदर्स डे साजरा केला जातो त्याचप्रमाणे फादर्स डे साजरा करावा असे वाटले. 


-  त्याकाळी याची अमेरिकेवर याची चर्चा झाल्यानंतर 1916 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. 


- त्यानंतर 1924 रोजी राष्ट्राध्यक्ष कॅल्विन कुलिज यांनी या प्रस्तावाला राष्ट्रीय स्तरावर साजरा करावा, असे जाहीर केल. 


- 1966 मध्ये लिंडन जॉन्सन या राष्ट्राध्यक्षांनी फादर्स डे प्रत्येक जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जाईल असे घोषित केले. 


- 1972 रोजी नव्याने आलेले राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी फादर्स डे नियमितपणे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जाईल असे जाहीर केले.

 

काळानुसार फादर्स डे सेलिब्रेशनमध्ये बदल-

 

- फादर्स डे हा आपल्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे फादर्स डेच्या दिवशी वडिलांना मस्त गिफ्ट देऊन त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू पाहण्यासारखे असते.

 

- मात्र, कालानुरूप या दिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बदल होत गेले आहेत. आता फादर्स डेसाठी सध्याची तरूणाई जरा हटके स्वरुपातच भेट देताना दिसून येतात. 


- कोणी आपल्या कूल डॅडींकरता सरप्राईज पार्टीचा बेत देतात तर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स किंवा विटेंज कलेक्शन असलेल्या भेटवस्तू देऊन त्यांना खूष करण्याचा प्रयत्न करताना काहीजण दिसतात.

 

बातम्या आणखी आहेत...