आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापणजी- न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गोवा तयार झाला आहे. देश-विदेशातील पर्यटक तेथे पोहचले आहेत. गोवा नेहमीच सेलिब्रेशनचे हॉट डेस्टिनेशन राहिले आहे. जेव्हा कधी नवे वर्ष साजरे करण्याचा विचार मनात येतो तेव्हा सर्वात आधी गोव्याचेच नाव समोर येते. बोनफायर जाळून आणि म्यूजिकवर थिरकायला एक वेगळीच मजा येते. दरवर्षी येथे जगभरातील पर्यटक ख्रिसमस आणि त्याला जोडून येणारे न्यू ईयर साजरे करण्यासाठी गोव्यात पोहचतात. ख्रिसमस सोमवारी साजरा झाला तर आता नवे वर्षे साजरे करण्यासाठी गोव्यात खास तयारी सुरू झाली आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला आज गोव्यातील नितांत सुंदर अशा 12 बीचेसबाबत माहिती देणार आहोत. जेथे न्यू ईयर सेलिब्रेशन दरम्यान जबरदस्त गर्दी उसळते. यामुळे खास आहे गोवा....
- कोकणातील दक्षिणी किना-यावर वसलेले गोवा आज देश विदेशातील लाखो पर्यटकांचे सर्वात पसंतीचे ठिकाण बनले आहे.
- संपूर्ण जगभरातून येथे दरवर्षी सुमारे 40 लाख टूरिस्ट येतात.
- आपल्या सुंदर आर्किटेक्चर, मोठे किल्ले, पोर्तूगीज चर्च आणि सुंदर मंदिरांजळच बनलेले बीचेस सर्वांना आकर्षित करतात.
- नव्या वर्षात जल्लोष करण्यासाठी फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून येथे पर्यटक येतात.
- येथे जगातील सर्वात दुसरा मोठा म्यूजिक कॉन्सर्ट 'सनबर्न' दरवर्षी जगभरातील लाखो तरूणाईला आकर्षित करतो.
- गोव्यातील सुंदर बीचेसमुळे याला 'पर्ल ऑफ ईस्ट' सुद्धा म्हटले जाते.
- येथे अनेक राजघराण्यांचे शासन राहिले त्यामुळे येथे वेगवेगळ्या परंपरा एकत्र दिसतात.
- गोवा आपल्या अॅडवेंचर स्पोर्ट्ससाठी ओळखला जातो. पॅराग्लाईडिंग, स्वीमिंग, पॅरासेलिंग, वॉटर डायविंग यासारख्या स्पोर्ट्सचे आनंद तुम्ही घेऊ शकता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गोव्यातील फेमस बीचेसचे फोटोज....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.