आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई रेल्‍वे प्रशासनाची चिंधीगिरी; तुटलेल्‍या रेल्‍वे रूळाला बांधले फडके, त्‍यावरून नेली रेल्‍वे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रेल्‍वे प्रशासनाच्‍या अक्षम्‍य हलगर्जीपणाचे एक उदाहरण समोर आले आहे. अधिका-यांनी तुटलेल्‍या रेल्‍वे रूळाला चक्‍क फडके बांधून त्‍यावरून धोकादायकरीत्‍या रेल्‍वे नेली. सुदैवाने यादरम्‍यान कोणतीही दुर्घटना झाली नाही. मात्र प्रवाशांचा जीव धोक्‍यात घालून अधिका-यांनी केलेल्‍या या प्रतापामुळे रेल्‍वे प्रवासी सुरक्षित आहेत का? हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

 

मानखुर्द आणि गोवंडी स्‍थानकांदरम्‍यान रेल्‍वे रूळाला तडा गेला होता आणि रूळाचा तुकडा पडला होता. असे असताना अधिका-यांनी ताबडतोब रेल्‍वे सेवा थांबवून हा हा रूळ दुरूस्‍त करणे अपेक्षित होते. मात्र असे न करता रेल्‍वे अधिका-यांनी चक्‍क या रूळाला फडके बांधून कसेबसे त्‍यांना जुळवून घेतले. नंतर त्‍यावरून रेल्‍वेही नेली. अशाप्रकारे शेकडो रेल्‍वे प्रवाशांचा जीव अगदी बेजबाबदारपणे रेल्‍वे अधिका-यांनी धोक्‍यात घातला. सुदैवाने तुटलेल्‍या रेल्‍वे रूळांचे अंतर जास्‍त नसल्‍याने काही दुर्घटना घडली नाही. माध्‍यमांत याविषयी बातम्‍या आल्‍यानंतर आता या रेलवे ट्रॅकच्‍या दुरूस्‍तीला सुरूवात करण्‍यात आली आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...