आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या विद्यार्थ्याचा झोपेतच हृदयविकाराने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवारपासून सुरू झाली. पण, तत्पूर्वीच मुंबईत प्रभादेवी येथे राहणाऱ्या दहावीच्या एका विद्यार्थ्याच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडली आहे. शिशुविहार विद्यालय या शाळेत शिकणाऱ्या ऋतिक घडशी या विद्यार्थ्याचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. केईएम रुग्णालयाने त्यास दुजोरा दिला आहे. 


दादर येथील शिशुविहार विद्यालयात ऋत्विक दहावीच्या वर्गात शिकत होता. बुधवारी रात्री अभ्यास करून झोपल्यानंतर दीडच्या सुमारास ऋत्विकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ऋतिकला कुटुंबीयांनी तातडीने मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत्युचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच निश्चित सांगणे शक्य आहे. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल स्थानिक पोलिसांकडे लवकरच सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. 
शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे. त्याचा अंतिम अहवाल एक महिन्यानंतर येणार आहे. दरम्यान, त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...