आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईसह कोकणात पावसाची संततधार, ठाण्यात झाड कोसळून पाच वाहनांचे नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कोकण आणि मुंबईत पावसाने कालपासून पुन्हा एकदा जोर धरला असून पावसाची संततधार आज दुस-या दिवशी कायम आहे. शनिवारी रात्री जोगेश्वरीमध्ये एका सोसायटीची भिंत पडल्याने तर ठाण्यात एक झाड पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. दोन्ही घटनांत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.  दुपारी हायटाईड उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

 

जोगेश्वरीतील सोसायटीत भिंत पडून त्याखाली सहा कार आणि एक मोटरसायकल दबली. मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत सुमारे तीस वर्ष जुनी होती, सलग पड़त असलेल्या पावसामुळे ही भिंत कोसळली तर ठाण्यात रविवार सकाळी इटर्निटी माॅलजवळ एक झाड कोसळून पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. भरपावसात हे झाड हटवण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...