आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai मुसळधार : सायन-हिंदमातासह अनेक भागांत पाणी साचले, आणखी दोन दिवस जोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शहरात रविवारीही जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे सायन आणि हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे वाहन धारकांचे हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 


हवामाना खात्याने कोकण किनारपट्टीसह मुंबईत शनिवारी रविवारी जोरदार पावसाचा इशारा दिला होता. मात्र शनिवारी हवामान खात्याने मुंबईत बुधवारपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. रविवारी सकाळीत मुंबईत पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रामुख्याने हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. रविवार असल्याने मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक नियोजित होता. मात्र पावसामुळे प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. 


घाटकोपरच्या पुलाला तडे 
घाटकोपर येथील पुलाला तडे गेल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी पुलावरील वाहतूक वळवली आहे. गेल्या आठवडाभरात असा तिसरा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी अंधेरीतील पुल कोसळला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ग्रँट रोड येथील पुलाला तडे गेलेले पाहायला मिळाले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...