आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी महिन्यांचा काय आहे अर्थ आणि कशी पडली नावे? जाणून घ्‍या रंजक‍ माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज संपूर्ण जगाने 'ग्रेगरियन' कालगणना स्विकारली आहे. पोप ग्रेगरी (तेरावे) यांनी हे कॅलेंडर प्रचारात आणल्यामुळे त्यांच्‍या सन्मानार्थ याला ग्रेगारियन कॅलेंडर हे नाव देण्यात आले. या पद्धतीला न्यू स्टाइल, ख्रिस्ती वा इंग्रजी कालगणना असेही म्हणतात. मात्र, या कंलेंडरमधील महिन्‍याला नावे कशी दिली गेली, या नावांचा अर्थ काय ? याची ही रंजक खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

 

जानेवारी
जानेवारी हा शब्द ‘जॅनरियुस’ या लॅटीन भाषेतील शब्‍दापासून तयार झाला. 'जानूस किंवा 'जेनस' या रोमन देवाच्‍या आधारे ‘जॅनरियुस’ हे नाव पडले. या देवाला पोटासमोर आणि पाठीमागे अशी दोन तोंडे असल्‍याची अख्‍यायिका आहे. त्‍यामुळे हा देव एकाच वेळी मागे आणि पुढे पाहू शकतो. जानेवारी महिन्‍याचेही असेच आहे. जानेवारीमध्‍ये मागील वर्षाला विसरले जात नाही आणि नवीन वर्षाचे स्‍वागत केले जाते. एकूणच काय तर व्‍यक्‍ती दोन वर्षांकडे समान नजरेने पाहते. त्‍यामुळे वर्षाच्‍या पहिल्‍या महिन्‍याला जानेवारी हे नाव दिले गेले.


पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, इतर महिन्‍यांविषयी...

बातम्या आणखी आहेत...