आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- मुंबईत वरळीमध्ये असलेलं 'कॅफे सी-फेस'वर अखेर महापालिकेने हातोडा चालवला. महापालिकेने तब्बल 11 वर्षांनी या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली. न्यायालयाने तोडकामाला स्थगिती देण्याचे आदेश रद्द केल्यानंतर शनिवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली. 2007 पासून राजकीय आणि इतर क्षेत्रातील वरदहस्तामुळे हे अनधिकृत हॉटेल सुरु होते.
वरळी परिसरातल्या खान अब्दुल गफ्फार खान मार्गावर वरळी सी-फेसच्या सुरुवातीलाच असलेल्या सुमारे दोन हजार चौरस फुटांच्या जागेत 2007 मध्ये एक अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होते या जागेत कॅफे सी-फेस (हॉटेल तवा) हे रेस्टाॅरंट होते. या उपहारगृहाचा तळमजला साधारणपणे दोन हजार चौरस फूट, तर पहिला मजला हा सुमारे एक हजार 500 चौरस फूट होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.