आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. आर. पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच भिडे गुरुजींना मोठे केले; हुसेन दलवाई यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भीमा कोरेगावप्रकरणी गुन्हा दाखल झालेले संभाजी भिडे यांना आर. आर. पाटील आणि जयंत पाटील या राष्ट्रवादीच्या दोन तत्कालीन गृहमंत्र्यांनीच मोठे केल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.

 

 

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी भिडे गुरुजी यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. या मागणीत राष्ट्रवादीही आघाडीवर आहे. वास्तविक राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी भिडे यांना मोठे केले होते, असा आरोप हुसेन दलवाई यांनी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत केला. आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना पोलिस यंत्रणेने मराठवाडय़ात अल्पसंख्याक युवकांचा छळ केला होता. त्यांच्यावर अत्याचार केला होता. त्याच वेळी भिडे यांच्यासारख्यांना राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी पाठीशी घातले होते, अशी टीकाही दलवाई यांनी केली. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती