आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक! आधी पत्नीचे हात-पाय बांधले, नंतर भाजी कापण्याच्या चाकूने चिरला तिचा गळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कौटुंबिक कारणातून झालेल्या भांणातून पतीनेच पत्नीचे हात-पाय बांधून गळा कापल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या भांडूप परिसरातील तुलेशत पाडा येथे ही धक्कादायक घटना घडली. नेहा गुप्ता असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी आरोपी पती बिरबलला अटक केली आहे. 
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा आणि बिरबलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. त्याना तीन मुली देखील आहे. त्यातील एक साडे 5 वर्षाची आहे. दुसरी दीड वर्षाची आणि तिसकी अवघ्या दीड महिन्याची आहे. गुरूवारी बहिनीच्या लग्नाला जाण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा चिघळला की संतापलेल्या बिरबिलने नेहाचे हात-पाय बांधले आणि स्वयंपाक घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने तिची गळा चिरून हत्या केली.


बिरबलने चोरांनी आपल्या पत्नीची हत्या केल्याचा बनाव केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला. चौकशीदरम्यान पोलिसांना बिरबलवरच संशय आला. परंतु, सुरूवातीला त्याने हत्येची कबूली दिली नाही. नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच बिरबलने आपणच पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा कबुल केला

बातम्या आणखी आहेत...