आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या खेळीला यश,राणेंना राज्यसभेत पाठवणार; नाराजी दूर,सेनेचेही मन राखले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना ‘दिल्ली’त जाण्यासाठी राजी करण्यात अखेर भाजपला यश अाले अाहे. राणेंना एनडीएत घेताना भाजपकडून राज्यात मंत्रिपदाचे अाश्वासन देण्यात अाले हाेते. मात्र तसे झाल्यास सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात अाला हाेता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही राणे अापल्या मंत्रिमंडळात नकाे हाेते. अखेर ही काेंडी फाेडण्यासाठी राणेंना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला. राणेंनीही त्याला तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली.


राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत असल्याने राणे अस्वस्थ हाेते. याबाबत त्यांनी वेळाेवेळी नाराजीही व्यक्त केली हाेती. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री राणेंनी मुख्यमंत्र्यांसह दिल्लीत जाऊन भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. राणे राज्यातच मंत्रिपदासाठी अाग्रही हाेते. मात्र प्राप्त परिस्थितीचा विचार करता तुम्हाला दिल्लीतच यावे लागेल, असे शहांनी राणेंना सुनावल्याचे कळते. त्यामुळे नाइलाजाने का हाेईल राणेंनी ही अाॅफर स्वीकारल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. 

 

जावडेकर, प्रधान यांचीही नावे चर्चेत
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ रिक्त जागांसाठी निवडणूक हाेत अाहे. संख्याबळाचा विचार करता भाजपचे तीन खासदार सहज  निवडून येऊ शकतात. त्यापैकी एका जागेवर राणे, तर उर्वरित दाेन जागांवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व धर्मेंद्र प्रधान यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

हे ही वाचा, अमित शहांच्या भेटीनंतर राणेंची स्वारी खूष, पण राज्यात की केंद्रात यावर सस्पेन्स कायम

बातम्या आणखी आहेत...