आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 ते 150 मतांच्या फरकाने जिंकणार- बीडमधील भाजप उमेदवार सुरेश धसांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरेश धस - Divya Marathi
सुरेश धस

बीड- उस्मानाबाद- लातूर- बीड या स्थानिक स्वराज संस्था विधान परिषदेच्या मतदारसंघातील निवडणुकीत मी 100 ते 150 मतांच्या फरकाने जिंकून येऊ, असा दावा भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केला आहे. बीड, लातूरसह उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यात भाजपला चांगले मतदान झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने गुप्त मतदान करण्याच्या पद्धतीचे उल्लंघन केल्याचा आरोपही धस यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने काही लोकांच्या शर्टवर चिप्स तर काहींच्या हातात घड्याळ, किचन घातले जेणेकरून मतदान कोणाला दिले हे कळेल. मात्र, हे गुप्त मतदान पद्धतीचं उल्लंघन केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

 

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनलेला उस्मानाबाद-लातूर- बीड या स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदारसंघात तीन जिल्ह्यातील सुमारे 1005 लोकप्रतिनिधी मतदार मतदान करत आहेत. त्यामुळे विजयासाठी तब्बल पाचशे मतांची बेगमी करावी लागणार आहे. यासाठी येथील मतदारांना एका मतासाठी पाच लाख रूपये दिले जात असल्याचे समोर आले आहे.

 

उस्मानाबाद-लातूर- बीड या स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. असे असले तरी ही खरी लढत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण- भावातच होत आहे. सुरेश धस यांना निवडून आणण्यासाठी पंकजा मुंडे यांनी आपली ताकद पणाला लावली आहे तर राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचा चंग धनंजय यांनी बांधला आहे. मात्र, सुरेश धस हे सुद्धा फोडाफोडीच्या राजकारणात माहीर आहेत. त्यामुळे विजय कोण खेचेल हे कोणीच सांगू शकत नाही अशी स्थिती आहे.

 

मात्र, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे हे एका-एका मताला तब्बल पाच लाख रूपये देत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, मतांची आकडेवारी व संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड असले तरी सुरेश धसांचे वैयक्तिक संबंध आणि पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा या निवडणुकीत राष्ट्रवादीला अस्थिर करण्यात यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे येथे कोण विजय मिळवेल याबाबत काहीच सांगता येत नाही. यानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वर्चस्वाची लढाई समोर आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...