आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमला मिल अाग प्रकरणी हाॅटेल वन अबव्हचे दाेन मालक अटकेत;व्यवस्थापक मात्र फरारच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कमला मिल परिसरातील हाॅटेलमध्ये २९ डिसेंबर राेजी लागलेल्या भीषण अाग प्रकरणात हाॅटेल ‘वन अबव्ह’चे फरार मालक कृपेश संघवी, जिगर संघवी या दाेघांना बुधवारी रात्री अटक करण्यात अाली. हाॅटेलचा व्यवस्थापक अभिजीत मानकर मात्र अजूनही फरार अाहे. पाेलिस त्याचा शाेध घेत अाहेत.


या अागीतील १४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे कृपेश व जिगर संघवी या दाेघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. तेव्हापासून हे दाेघेही फरार हाेते. त्यांचा शाेध लागत नसल्यामुळे पाेलिसांनी या दाेघांवरही प्रत्येकी एक लाखाचे इनामही जाहीर केले हाेते. मागील अाठवड्यात पाेलिसांनी ‘माेजाेस’ पबचा मालक व निवृत्त अायपीएस अधिकाऱ्याचा मुलगा युग पाठक व हाॅटेल व्यावसायिक विकास कारिया या दाेघांना याच प्रकरणात पाेलिसांनी अटक केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...