आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍यात महिला व बालकांवरील अत्याचारांचे गुन्हे वाढले;उत्तर प्रदेशपाठाेपाठ दुसरा क्रमांक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांके‍तीक फोटो - Divya Marathi
सांके‍तीक फोटो

मुंबई- गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत राज्यात यंदा महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे. आर्थिक पाहणी अहवालातून ही बाब उघड झाली असून मोठ्या राज्यांमध्ये महिला आणि बालकांच्या अत्याचारात महाराष्ट्र हा उत्तर प्रदेशच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असल्याचे दावे फडणवीस सरकारकडून केले जात असले तरीही महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१५ मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांची संख्या ३१ हजार १२६ इतकी होती, तर २०१६ मध्ये हे प्रमाण ३१ हजार २७५ वर पोहोचले. २०१७ मध्ये तर तब्बल ३२ हजार १०० महिला अत्याचारविषयक गुन्ह्यांची नोंद राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यंदा हुंडाबळी, पती व नातेवाइकांकडून दिली जाणारी क्रूर वागणूक, लैंगिक अत्याचार आणि अनैतिक व्यापार याबाबतच्या गुन्ह्यांमध्ये मात्र काहीशी घट झाली आहे. बालकांवरील अत्याचारांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. २०१५ मध्ये बालकांवरील अत्याचाराचे १३ हजार ९४१ गुन्हे नोंदवण्यात आले. २०१६ मध्ये ही संख्या १३ हजार ५९१ वर पोहोचली. २०१७ मध्ये मात्र यात मोठी वाढ होत तब्बल १५ हजार ५३४ इतक्या गुन्ह्यांची नोंद राज्यात झाली. 

बातम्या आणखी आहेत...