आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात अकरा हजार यात्रेकरूंना ‘हज’ची संधी; राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी समितीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वाढ करणार असल्याचे आश्वासन अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी दिले. हज हाऊस येथे कांबळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य हज समितीच्या हज यात्रा २०१८ संगणकीय सोडतीद्वारे यात्रेकरुंची निवड करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.

  
कांबळे पुढे म्हणाले, हज समितीमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. ही समिती प्रत्येक घटकातील व्यक्तीची मदत करण्यात अग्रेसर आहे. यामुळेच या समितीची अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीमध्येही वाढ करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. राज्यासह देशभरातून हज यात्रेला दरवर्षी हजारो यात्रेकरू जातात.  गेल्या वर्षी राज्यातील ९ हजार २४४ यात्रेकरूंना वाटा देऊन हज यात्रेची संधी देण्यात आली होती. केंद्र व राज्य शासनाने हा हिस्सा २० टक्क्यांनी वाढवला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ११ हजार ५२७ यात्रेकरूंना हज यात्रेची संधी देण्यात आली. सातत्याने तीन वर्षे अर्ज करून चौथ्या वर्षी हज यात्रेला जाण्याची संधी उपलब्ध करून देण्याची योजना बंद करण्यात आली असून ती पुन्हा सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  


हज २०१८ साठी ४३ हजार ७७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित ४१ हजार ८२४ यात्रेकरूंमधून संगणकीय सोडतीद्वारे सुमारे ९ हजार यात्रेकरूंची निवड करण्यात आली. यापैकी १ हजार ९३९ जागा ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि १६ महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...