आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे काँग्रेस- भाजपला जमलं नाही ते अपक्ष आमदार बच्चू कडूंनी \'करून दाखवलं\'!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने झेंडा फडकावला आहे - Divya Marathi
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने झेंडा फडकावला आहे

मुंबई- अमरावती जिल्‍ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे महाराष्‍ट्रात आपल्या अनोख्‍या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. आमदार बच्चू कडू हे पूर्वी फक्त आपल्याच मतदारसंघात व भागापुरते काम करायचे होते. मात्र, आता बच्चू कडू संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. याचे कारण जनसामान्यांच्या प्रश्नांविषयी त्यांची असलेली तळमळ. अचलपूर व अमरावती भागापुरते काम केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की राज्यातील इतर भागातही गरीब, सामान्यांची हीच अवस्था आहे. मग त्यांनी आपल्या कक्षा रूंदावत काम करायचे ठरवले. गरिबीला कोणतीही जात, धर्म नसतो व तो माझ्या भागातील असो की इतर भागातील. त्यामुळे बच्चू कडू यांनी संपूर्ण राज्यातील गरिबांसाठी काम करायचे ठरवलेले आहे. त्यामुळे ते आता आपल्या मतदारसंघात कमी व उर्वरित महाराष्ट्रात जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी फिरत असतात, समस्या जाणून घेत असतात. मात्र, आता त्याचा राजकीय फायदाही होताना दिसत आहे.

 

गुरूवारी लागलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नगरपालिका निवडणूक निकालात आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने आपला झेंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांना पाणी हे भव्य यश संपादित केले आहे. त्यामुळे त्याचे मोल अधिक आहे. 

 

पांढरकवडा नगरपालिकेत बच्चू कडू यांच्या प्रहार युवा शक्ती संघटनेने 19 पैकी तब्बल 14 जागा जिंकल्या. सोबतच प्रहार संघटनेच्याच वैशाली नहाते या 1270 मतांनी बाजी मारत नगराध्यक्षपदी निवडून आल्या. या विजयामुळे अमरावती जिल्ह्याबाहेर पहिल्यांदाच प्रहार संघटनेचा नगराध्यक्ष, नगरपालिकेत सत्ता आली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष म्हणवल्या जाणा-या भाजपला तीन जागा, तर काँग्रेसला आणि शिवसेनेला प्रत्येकी 1 जागेवर यश मिळवता आले. राष्ट्रवादीला खातेही खोलता आले नाही.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अनोख्या आंदोलनाची माहिती व फोटो...

बातम्या आणखी आहेत...