आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-चीन मैत्री संबंध बळकट व्हावेत : चीनच्या सिचुआन प्रांताचे उपराज्यपाल पेंग युसिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चीन-भारत मैत्रीचे संबंध या माध्यमातून अधिक बळकट व्हावेत, असा प्रयत्न असल्याचे चीनच्या सिचुआन प्रांताचे उपराज्यपाल पेंग युसिंग यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रामधील तसेच मुंबईमधील औद्योगिकदृष्ट्या वातावरणाची पाहणी करण्यासाठी तसेच गुंतवणुकीच्या संधींविषयी माहिती घेण्यासाठी ते दौऱ्यावर आले आहेत. 


त्यांनी शिष्टमंडळासह विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची विधानभवनात भेट घेतली, त्या वेळी ते बाेलत हाेते.  
या वेळी संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, आमदार संजय दत्त, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे आदी उपस्थित होते.


शिष्टमंडळामध्ये सिचुआन प्रांताचे उप महासचिव जू जियाद, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे उपमहासंचालक लिओ डोंग, सिचुआन प्रांताच्या असेट सुपरव्हिजन अँड ॲडमिनिस्ट्रेशन कमिशनचे उपमहासंचालक क्वीं मिंग, फॉरेन आणि ओव्हरसीज चायनीज अफेअर्सचे उपमहासंचालक चेन झिकाँग यांच्यासह सिचुआन प्रांतातील विविध विभागांचे आणि शासन अधीनस्थ कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. पेंग युसिंग यांनी कापडावरील पांडाचे चित्र सभापती आणि अध्यक्षांना भेट दिले.  

 

औरंगाबाद जिल्ह्यात गुंतवणूक करावी  
अजिंठा-वेरूळ परिसरात सर्व अाैद्याेगिक सुविधा देऊ. औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ ही जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे असून तेथे आपण अवश्य भेट द्यावी, येथे औद्योगिक वसाहत असून तेथे आपण उद्योग आणल्यास त्याचे स्वागतच आहे, त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ, असेही हरिभाऊ बागडे यांनी या वेळी सांगितले.  

 

 

साखर अायात करावी  
राज्यामध्ये साखर, दूध व कापसाचे जास्त उत्पादन होते. तसेच चीन दौऱ्यादरम्यान चीनमध्ये साखर व दुधाचे उत्पादन कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे या उत्पादनांची महाराष्ट्राकडून आयात करावी.

हरिभाऊ बागडे, अध्यक्ष, विधानसभा  

 

महाराष्ट्रात पूरक वातावरण  
विधानमंडळाच्या वतीने चीनचा दौरा केला होता त्या वेळी चीनने अल्पावधीतच केलेली प्रगती पाहून आपण प्रभावित झालाे अाहाेत. महाराष्ट्रात गुंतवणुकीला पूरक वातावरण असून चीनने येथे गुंतवणूक करावी. 
रामराजे नाईक- निंबाळकर, सभापती, विधान परिषद

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...