आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ गुरुवारी टी-२० तिरंगी मालिकेत समोरासमोर भिडतील. हा सामना मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवर सकाळी १० वाजता खेळवला जाईल. मालिकेतील तिसरी टीम इंग्लंड आहे.
भारतीय महिला क्रिकेटच्या ४० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने कोणत्या प्रकारात तिरंगी मालिकेचे अायोजन केले आहे. भारताने पहिला कसोटी सामना १९७६ मध्ये खेळला. त्यानंतर त्याचे वनडेमध्ये १९७८ मध्ये पदार्पण झाले. भारताने लगेच दुसऱ्या विश्वचषकाचे १९७८ मध्ये यजमानपद भूषवले. परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारात तिरंगी मालिकेचे आयोजन केले नाही. एशिया कप वगळता भारताने आतापर्यंत केवळ दोन तिरंगी मालिका खेळल्या आहेत. यापूर्वी अखेरच्या वेळी १९९५ मध्ये इंग्लंडमध्ये तिरंगी मालिका खेळली. २००६ मध्ये टी-२० खेळत असलेली भारतीय टीम पहिल्यांदा या प्रकारात तिरंगी मालिकादेखील खेळेल.
दोन वर्षांनी पहिल्यांदा भिडणार : भारत आणि ऑस्ट्रेलियाचा महिला संघ दोन वर्षांनी पहिल्यांदा टी-२० मालिकेत खेळणार आहे. यापूर्वी दोन्ही संघांनी जानेवारी २०१६ मध्ये ३ सामन्यांची मालिका खेळली होती. तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर २-१ ने पराभूत केले होते. मात्र, सध्या परिस्थिती भारताच्या बाजूने दिसत नाही. ऑस्ट्रेलियाने गेल्या आठवड्यात भारताला ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० ने हरवले आहे.
एकता बिष्टच्या जागी राजेश्वरी गायकवाडला संधी
पराभवातून बाहेर पडत भारतीय संघ सकारात्मक विचारांनी मैदानात उतरेल. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात झेल घेताना हाताच्या बोटाला दुखापत झालेल्या एकता बिष्टच्या जागी राजेश्वरी गायकवाडला संघात संधी देण्यात आली. एकताला दहा दिवस विश्रांती सांगण्यात आली आहे. या मालिकेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारी स्मृती मानधना उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ
मेग लॅनिंग कर्णधार, राचेल हेन्स, निकोला केरी, एशली गार्डनर, एलिसा हिली, जेस जोनासन, डेलिसा किमिन्स, सेफी मोलाइनेक्स, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शट, नाओमी स्टालेनबर्ग, एलेस विलानी, अमांडा जेड वेलिंग्टन.
भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार),
स्मृती मानधना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्ज, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, झुलन गोस्वामी, शिखा पांडेय, पूजा वस्त्रकर, रुमेली धर, मोना मेश्राम, राजेश्वरी गायकवाड.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.