आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील कोट्यधीशांची संख्या २० टक्के वाढली; श्रीमंतांची संपत्ती ६८ लाख कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वर्ष २०१७ मध्ये देशातील कोट्यधीशांच्या संख्येत २०% वाढ झाली आहे. कोट्यधीशांच्या संपत्तीतही २१% वाढ नोंदवण्यात आली. फ्रान्सच्या सल्लागार आणि तंत्रज्ञान कंपनी कॅपजेमिनीच्या अहवालात यासंदर्भातील दावा करण्यात आला आहे. 


निधी वितरणात असमानतेचे आरोप होत असताना सामाजिक चिंतेत वाढ झाली. यातच हा अहवाल समोर आला. त्यानुसार, श्रीमंतांच्या (हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजेच एचएनआय) संख्येत २०.४% वाढ झाली आहे. तर त्यांच्या एकूण संपत्तीत २१% वाढू होऊन ती ६८ लाख कोटी रुपये झाली आहे. कॅपजेमिनीने म्हटले आहे की, एचएनआयची संख्या आणि संपत्ती या दोन्ही बाबतीत भारताचा विकास अनुक्रमे ११.२% आणि १२% च्या जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. 


जागतिक श्रीमंतांची संपत्ती ४,७६० लाख कोटींवर 
- श्रीमंतांच्या संपत्तीत सतत सहाव्या वर्षी वाढ. २०११ नंतर दुसऱ्यांदा जास्त वाढ. 
- जागतिक एचएनआयची संपत्ती पहिल्यांदा ४,७६० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली. 
- बड्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या मालमत्ता व्यवस्थापनाचा विचार करता १२ लाख कोटी त्यांना मिळू शकतात. आशिया-पॅसिफिकच्या - ८१% श्रीमंतांनी मालमत्ता व्यवस्थापनात रस दाखवले आहे. 
- आशिया-पॅसिफिक आणि उत्तर अमेरिकेमध्ये एचएनआयची संख्या वेगाने वाढत आहे. एकूण जागतिक वृद्धीत ७४.९% वाढ या दोन्ही क्षेत्रांत नोंदवण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...