आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक आहेत प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजाज समुहाजे अध्यक्ष राहूल बजाज यांचा आज वाढदिवस आहे. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी बंगाल येथील प्रेसीडेंसीमध्ये झाला. राहुल भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक आहेत. ते बजाज समूहाचे अध्यक्ष असून हा समूह भारत आणि विदेशांमध्ये अनेक उत्पादने आणि वित्तीय सेवा प्रदान करण्यासाठी ओळखल्या जातो. बजाज समूहाचा व्यावसाय हा दुचाकी वाहन, घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनीक लॅम्प, पवन उर्जा, विशेष मिश्र धातू आणि स्टेनलेस स्टील, पोर्जिंग, यात्रा, जनरल आणि जिवन विमा यासारख्या उत्पादन आणि जिवन विमासारख्या सेवाक्षेत्रात वित्तीय गुंतवणूकीत यशस्वीरित्या काम करत आहे.


सुरुवातीचे आयुष्य....
राहूल यांचे आजोबा कमलनयन बजाज यांनी उद्योजकतेची पायाभरणी केली. त्यानंतर पुढील पिढीने बाजज घराण्याचा व्यावसाय वाढवण्याचे काम केले. राहूल बजाज यांनी  कॅथेड्रल अॅन्ड जॉन कॉनन स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफेंस कॉलेजमधून अर्थशास्त्र (ऑनर्स) पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. तसेच त्यांनी हार्वर्ड बिजनेस स्कूलमधून एमबीए देखील केले.


राहूल यांच्या करियरची सुरूवात...
राहूल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची धुरा संभाळली. त्यांच्या कुशल नेतृत्वात कंपनीने लायसन्स-राज सारख्या कठिन परिस्थितीत देखील यशस्वी घोडदौड चालू ठेवली. 1980 चच्या दशकात बजाज दुचाकी स्कूटरचा अग्रगण्य निर्माता होता. बजाज समूहाच्या 'चेतक' स्कूटरला एवढी मागणी होती होती की, त्यासाठी 10 वर्षांचा वेटिंग-पीरियड होता. राहूल बजाज अनेक कंपण्यांच्या बोर्डाचे अध्यक्ष देखील आहे. आर्थिक क्षेत्र आणि उद्योग जगतात त्यांचे योगदान पाहून भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे सदस्य (2006-2010) म्हणून त्यांची निवड करण्यात आली. आयआयटी रुडकीसह सात विद्यापीठांनी त्यांना मानद पदवी प्रदान केली आहे.


जागतिकीकरणाला विरोध...
1990च्या दशकात भारतात जागतिकीकरणास सुरूवात झाली. हा काळ बजाज ऑटोसाठी अनेक आव्हाने घेऊन आला. स्वस्त आयात आणि थेट विदेशी गुंतवणूक (FDI) यासारखे आव्हाने जागतिकीकरणासोबत आले, त्यामुळे राहुल बजाज यांनी जगतिकीकरणाला विरोध केला. स्कूटरची मागणी कमी होऊ लागली, लोक मोटरसायकलमध्ये अधिक रुची दाखवू लागले आणि बजाजचा प्रतिस्पर्धी असलेल्या हिरोहोंडाला याचा अधिक फायदा झाला.


पुरस्कार आणि सन्मान...
- 2001 मध्ये भारत सरकारकडून त्यांना ‘पद्म भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- हार्वर्ड बिजनेस स्कूलतर्फे अलुमिनी (माजी विद्यार्थी) अचीवमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- नवभारत टाइम्स, अन्स्ट अॅन्ड यंग आणि सीएनबीसी टीव्ही 18 तर्फे 'लाइफ टाइम अचीवमेंट पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
- फ्रांसच्या राष्ट्रपतिकडून “नाइट इन द आर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर” नियुक्त करण्यात आले.
- भारत सरकारने राहुल बजाज यांना 1975 ते 1977 पर्यंत ऑटोमोबाइल आणि संबंद्ध उद्योगाच्या विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणून नेमले
- 1975 मध्ये त्यांना राष्ट्रीय गुणवत्ता इंश्योरन्स संस्थेकडून मॅन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 1990 मध्ये प्रबंधन क्षेत्रात सर्वात विशिष्ट सेवांसाठी त्यांना बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- 1992 मध्ये प्रिंन्स ऑफ वेल्सने त्यांना “प्रिंस ऑफ वेल्स इंटरनेशनल बिजनेस लीडर्स फोरम”चे सदस्य बनवले
- FIE फाउंडेशनने त्यांना 1996 मध्ये राष्ट्र भूषण पुरष्काराने सन्मानित केले.
- लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टने 2000 मध्ये बजाज यांना टिळक पुरस्कार देऊन सन्मानित केले.


भूषवलेले पदं....
भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना 2003 ते 2006 पर्यंत ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई’च्या बोर्ड ऑफ गवर्नर्सचे अध्यक्ष बनवले. ते अंतरराष्ट्रीय व्यापार परिषद जिनेवाच्या आर्थिक मंचाचे माजी अध्यक्ष आणि सदस्य आहेत. तसेच, हार्वर्ड बिजनेस स्कूलचे जागतिक सल्लागार बोर्डचे देखील सदस्य आहेत. राहुल बजाज ब्रूकिंग्स इंस्टीट्यूशन, वाशिंगटन डीसीच्या अंतर्राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत. तसेच. इंडियन स्कूल ऑफ बिजनेसच्या कार्यकारी बोर्डाचे सदस्य देखील आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...