आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या सागरी किनार्‍यावर विषारी ब्लू बॉटल जेलीफिशचा हल्ला, 150 हून अधिक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या सागरी किनार्‍यावर विषारी ब्लू बॉटल जेलीफिश (Blue Bottle Jellyfish) मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. विषारी जेलिफिशच्‍या चाव्‍याने 150 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनेही यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे. ती म्हणजे नागरिकांना तूर्तास समुद्रकिनार्‍यावर न जाण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

 

पुर्तगाली मॅन-ऑफ-वॉर (Portuguese man-of-war) या नावानेही जेलीफिश ओळखल्या जातात. मागील काही दिवसांपासून मुंबईतील गिरगाव व दादर चौपाटीवर जेलिफिश आढळून आल्‍या होत्‍या. त्‍यांनी अनेकांचा चावा घेतल्‍याचेही नंतर समोर आले होते. चाव्‍यामुळे तीव्र वेदना होतात व अनेक दिवस त्‍या वेदना कायम राहतात, असे पीडितांनी सांगितले आहे. मुंबईतील जुहू, अक्‍सा व वर्सोवा बीचवरही या जेलिफिशचा वावर असल्‍याचे समोर आले आहे.

 

चाव्‍यामुळे होतो हा त्रास
जीव वैज्ञानिकांच्‍या मते,  मान्‍सूनदरम्‍यान या जेलिफिशचे वजन घटते. यामुळे त्‍या समुद्राच्‍या लाटांसोबत किनार्‍यावर फेकल्‍या जातात. त्‍यांच्‍या चाव्‍यामुळे व्‍यक्‍तीला तीव्र वेदना होतात. चाव्‍याच्‍या ठिकाणी जखमांच व्रणही पडतात. एवढेच नाही तर बहुतांश ऐकू न येण्याची तक्रारही करतात. जेलिफिशने चावा घेतल्‍यानंतर ताबडतोब डॉक्‍टरांना दाखवावे; असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करूनप पाहा... विषारी ब्लू बॉटल जेलीफिशचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...