आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबाद-मुंबई महामार्गावर बस-कंटेनर भीषण अपघात, दोन ठार, तिघे गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर- माल वाहून नेत असलेला कंटेनर आणि खासगी प्रवासी बसदरम्यान झालेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (मंगळवार) सकाळी अहमदाबाद-मुंबई महामार्गावर घडली.

 

मृतात मधुबेन सोलंकी नामक 61 वर्षीय वृद्ध महिलेचा आणि रमेशभाई नामक बसचालकाचा समावेश आहे. खासगी बस प्रवासी घेऊन अहमदाबादहून मुंबईकडे येत असताना तिचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेने येत असलेल्या कंटेनरवर जाऊन बस आदळली. या अपघातात जखमी झालेल्या तिघांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... बस आणि कंटेनरच्या अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...