आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11: मुंबई हल्ल्यात शहीद झाले होते 11 REAL HERO हीरो, आजही संपूर्ण देश करतो सलाम!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 26 नोव्हेंबर 2008ला त्या काळ्या रात्री मुंबईमध्ये जे घडले ते कधीही न विसरण्यासारखे आहे. लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी 59 तासांत मुंबईमध्ये प्रचंड दहशत पसरवली होती.

 

समुद्राच्या मार्गाने मुंबईत दाखल झालेल्या या दहशतवाद्यांनी तब्बल 167 निष्पाप लोकांचा बळी घेतला होता.  या हल्ल्यात 800 लोक गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश होता. हल्ल्यात सामील दहशतवादी कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. त्यांच्या इतर सहकार्‍यांचा एनएसजी कमांडोजनी खात्मा केला होता.

 

मुंबईवरील महाभयंकर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आई-वडील गमावलेला मोशे होल्त्झबर्ज तब्बल 9 वर्षांनंतर भारत भेटीला आला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने मोशेही मुंबईत दाखल झाला आहे. मोशे 17 जानेवारीला इस्रायलच्या पंतप्रधानांसह मुंबईत उपस्थित राहाणार आहे. तसेच 18 जानेवारी तो, पंतप्रधान मोदी, पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत छाबाडा हाऊसचा दौरा करणार आहे.

 

कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी फाशी देण्यात आली. परंतु या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद आजही पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरतोय. या प्रकरणाचा खटला कोर्टात सुरु आहे. अमेरिकेच्या तुरुंगात बंद असलेल्या मुंबईचा तिसरा गुन्हेगार डेव्हिड कोलमॅन हेडलीला दोषी करार देण्यात आला आहे. त्याला तिथे 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

सगळे जग हादरवून टाकणार्‍या दहशतवादी हल्ल्यात भारताने अनेक शूरवीर अधिकारी गमावले आहेत. शिवाय काही असेही लोक आहे, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मानव धर्म निभावून इतर लोकांचे जीव वाचवले. चला जाणून घेऊया मुंबईच्या त्या 12 हीरोंविषयी, ज्यांच्यावर संपूर्ण देशाला अभिमान आहे.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या...मुंबईच्या 11 हीरोंविषयी...

बातम्या आणखी आहेत...