आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती महामार्गावर कारची ट्रकला धडक; पोलिस निरीक्षकाच्या मुलीसह पाच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अमरावती महामार्गावर एका ट्रकला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर तिघे जण गंभीर जखमी झाले. यात  दोन तरुणींचा समोवश आहे.  हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला होता. अपघातातील जखमींवर रामदासपेठेतील मेडिट्रिना हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर ठार झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले.   


धीरज पथाडे (२०), विशाल रथवानी (२१), सत्या सिंग (२०), दिव्या पाकू (२१), निशा निकम (२१) अशी मृतांची नावे आहेत. तर इव्हाना परवीन खान (२२), शाहबाज जफर अलवी (२२) व मैत्रेय आवळे (२२) हे तिघे जखमी झाले. यातील निशा ही नागपूर गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक राजेंद्र नाईक यांची मुलगी आहे. अपघातानंतर घटनास्थळी जमाव जमल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वडधामनाजवळ कारमधून िवद्यार्थी भरधाव येत होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने मागून धडक दिली. यातच पाच जण  जागीच ठार झाले. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...