आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मागण्यांसाठी अन्नदात्याच्या रक्तबंबाळ पायांनी कापले 200 किलोमीटरचे अंतर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोईवर आग ओकणारा सूर्य...पायाखाली विस्तवासारखी तापलेली धरणी...रक्तबंबाळ झालेल्या पायांनी नाशिकहून मुंबईपर्यंत तब्बल 200 किलोमीटर चालत आलेला अन्नदाता... परंतु निर्धार शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा! आपल्या हक्काच्या मागण्या मान्य करुन घेण्याचा! किसान लाँग मोर्चमधील मन हेलावून टाकणारे चित्र संपूर्ण महाराष्‍ट्रासह देशाने पाहिले.

 

मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांचे लाल वादळ पासून सरकारचे डोळे खाडकन उघडले अन् अन्नदात्याच्या अनेक मागण्या सरकारला मान्य कराव्या लागल्या. सरकारच्या लेखी आश्वासनानंतर किसान लाँग मार्च मागे घेण्यात आला.

 

किसान लाँग मोर्चाच्या शिष्टमंडळाने कोण-कोणत्या मागण्या सरकारपुढे मांडल्या होत्या आणि सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून टाकूया एक नजर...

बातम्या आणखी आहेत...