आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTVमध्ये कैद झाला मृत्यू.. शुल्लक भांडणातून महिलेने प्रवाशाला लोकल ट्रेनसमोर ढकलले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुलुंड रेल्वे स्टेशनवरील हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून महिलेने एका 56 वर्षीय प्रवाशाला लोकल ट्रेनसमोर ढकलले. त्याचवेळी लोकल आल्यामुळे त्याखाली चिरडून सदर प्रवाशाचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना स्टेशनवर बसवलेल्या CCTV कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

 

दीपक चमनलाल पटवा (56) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पटवा यांच्या मेहुण्याच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी मनिषा ललित खाकडिया या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

 

काय आहे हे प्रकरण?
दीपक पटवा हे शनिवारी (ता.21) दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एका महिलेला त्यांचा धक्का लागला. तिच्यासोबत बाचाबाची सुरु असताना एक जण मध्ये पडला आणि दीपक यांचे त्याच्यासोबतही खटके उडाले. बाचाबाची सुरु असताना महिलेने पटवा यांना ढकलेले. पटवा हे प्लॉटफॉर्मवरून थेट ट्रॅकवर पडले. परंतु त्याचवेळी ट्रॅकवर  लोकल आल्यामुळे त्याखाली पटवा यांचा चिरडून मृत्यू झाला.

दीपक पटवा मागील 36 वर्षांपासून स्टील ब्रोकिंगचा व्यवसाय करत होते. मस्जिद बंदर येथील लोखंड बाजारमध्ये त्यांचे दुकान होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मुलुंड रेल्वे स्टेशनवरील हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...