आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडसेंना अडकवण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडून सुपारी; कल्पना इनामदारांचा अाराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जमीन घोटाळा व दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरून मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी भाजपच्याच ज्येष्ठ मंत्र्याने सुपारी दिली असल्याचा खळबळजनक अाराेप सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. 


अण्णांच्या आंदोलनात भ्रष्टाचाराचा पैसा लागला असल्याचा आरोप करून अंजली दमानिया यांनी अण्णांचा अपमान केला अाहे. त्यांच्याविराेधात १ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, यासंदर्भात ३ वर्षांपूर्वी दमानिया यांच्या घरी बैठक झाली होती. मी उद्योजक आहे. माझ्या मिळकतीतून मी अण्णांच्या आंदोलनाचा खर्च केला आहे. हा संपूर्ण व्यवहार मी धनादेशाने केला.  अण्णांच्या आंदोलनाला भ्रष्टाचाराचा पैसा लागला आहे, असा आरोप करून दमानिया यांनी अण्णांचा अपमान केला आहे. अापण दमानिया यांच्याविरोधात एक कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

 
३० दिवसांत चौकशी करा, अन्यथा उपोषण 

या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी दमानियांच्या घरी आलेल्यांची नार्को टेस्ट करावी. माझ्यावरील आरोपांची ३० दिवसांत चौकशी करावी; अन्यथा अापण अाझाद मैदानात उपोषणाला बसू, असा इशाराही इनामदार यांनी या वेळी दिला.

 

पुढील स्लाइढ्‍सवर वाचा...एकनाथ खडसेंना फसविण्याचा अंजली दमानिया यांचा पूर्व नियोजित कट

बातम्या आणखी आहेत...