आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई एअरपोर्टवर मोठी दुर्घटना टळली; लॅंड करताना घसरले एअर इंडियाचे विमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई एअरपोर्टवर मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली. विजयवाडाहून मुंबईला आलेले एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाईट आयएक्स 213 धावपट्‍टीवर लॅंड करताना घसरले. विमान धावपट्टीच्या बाजुला असलेल्या मातीत फसले. ही घटना दुपारी 2 वाजून 51 मिनिटांला घडली.

 

विमानातील सर्व प्रवासी तसेच क्रू मेंबर सुखरुप आहेत. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ के.एस. सुंदर यांनी सांगितले आहे. दरम्यान, घाटकोपर येथे चार्टर्ड विमान कोसळले होते. यात महिला वैमानिकासह पाच जणांना मृत्यू झाला होता.

 

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा सर्वाधिक परिणाम विमान सेवेवर झाला. अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...