आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींच्या घरी Grand Celebration सुरु, पाहा श्लोकाचा प्री एंगेजमेंट 1st Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- येत्या 30 जूनला मुकेश अंबानी यांचे थोरले चिरंजिव आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा होणार आहे.  अंबानी फॅमिलीत ग्रँड सेलिब्रेशनलासुरुवात झाली आहे. 27 जूनला मेंदी फंक्शन झाले. त्यात बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रियांका चोप्रा दिसली. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर मेंदी फंक्शनचे काही फोटोज पोस्ट केले आहेत. अंबानींचे आलिशान घर 'एंटीलिया'मध्ये मेंदी फंक्शनचे आयोजन करण्यात आले होते.

 

श्लोकाचा प्री इंगेजमेंट 1st Look...

- इंगेजमेंट सेरेमनीच्या आधी मेंदी सेरेमनीत अंबानी फॅमेलीने धूम केली. डार्क नेव्ही ब्लू कलरचा लंहेगा परिधान केलेल्या श्लोकाचे फोटो समोर आले आहेत. त्यात श्लोका ही अत्यंत सुंदर दिसत आहे.

- हे सर्व फोटो ईशा अंबानीने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. याशिवाय एक व्हिडिओ देखील अपलोड करण्‍यात आला आहे. त्यात श्लोकाच्या हातावर मेंदी सजलेली दिसत आहे. विशेष म्हणजे ती आणि ईशा अंबानीसोबत 'रॉक एंड रोल' डान्स करताना दिसत आहे.
 

गोव्यात झाली होती प्री एंगेजमेंट सेरेमनी
- आकाश आणि श्लोकाची  प्री-एंगेजमेंट सेरेमनी 24 मार्च रोजी गोव्यात झाली होती. 'ताज एक्जोटिका रिसोर्ट अॅण्ड स्पा'मध्ये ही सेरेमनी झाली होती. फुलांनी सजवलेल्या एका स्टेजवर आठ मिनिटांचे फोटोशूट झाले होते. यात आकाशने श्लोका हिला प्रपोज केले होते.
- नंतर डान्स पार्टी झाली होती. त्यात आकाश-श्लोकासह नातेवाईक-मित्रांनी डान्स केला होता.

 

शिक्षणही सोबतच...

- मुकेश आणि नीता अंबानी यांनी तीन मुले आहेत. त्यात आकाश आणि ईशा जुळे मुले असून अनंत हा धाकटा आहे.
 - श्लोका ही हिर्‍यांचे व्यापारी रसैल मेहता यांची धाकटी कन्या आहे. अंबानी आणि मेहता परिवार एकमेकांचा चांगल्यापैकी ओळखतात.

- श्लोका आणि आकाशने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सोबत शिक्षण घेतले आहे.
- आकाशने अमेरिकेतील ब्राउन यूनियव्हर्सिटीमधून इकोनॉमिक्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... श्लोकाचा प्री एंगेजमेंट 1st Look

बातम्या आणखी आहेत...