आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात वेळेआधीच उष्णतेची लाट; अकोला सर्वाधिक हॉट तर ब्रह्मापुरी, जळगाव 38 अंंशावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- होळीच्या दुसर्‍या दिवशीच हवामान बदलाचा परिणाम देशातील बहुतांश शहरात दिसत आहे. देशभरात वेळेआधीच उष्णतेने लाट आल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील अकोला शहर देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे. अकोल्यात सर्वोच्च तापमानाची (39.5 अंश सेल्सिअस) नोंद झाली आहे.

 

अकोला व्यतिरिक्त महाराष्ट्रातील जळगाव, परभणी, ब्रह्मापुरी आणि वर्धा येथे 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

 

पारा पोहोचला 40 अंश सेल्सिअसच्या जवळ

दरम्यान,मागील काही दिवसांपासून उत्तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारताच्या बऱ्यात भागांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले. गुजरातपासून कर्नाटकपर्यंत दिवसाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... देशातील सर्वात उष्ण शहरे...

बातम्या आणखी आहेत...