आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- 2015 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरवलेल्या छायाचित्र प्रदर्शनातून जमा झालेल्या रकमेतून काही रक्कम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केरळमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून जाहीर केले आहे. मात्र, त्यांनी ट्वीटमध्ये 2014 मध्ये प्रदर्शन भरवल्याचा उल्लेख केला आहे.
यासोबतच शिवसेनेचे सर्व खासदार, आमदारही केरळमधील पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचा पगार देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
2015 मध्ये 7 ते 13 जानेवारीदरम्यान मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरे यांनी छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनातील फोटो विक्रीतून 5 कोटी 11 लाख रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. ही सर्व रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. यातील 4.5 कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून दिल्याच शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले होते. त्यातील रकमेतून केरळमधील पूरग्रस्तांना मदत दिली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य पाठवलेTo stand with Kerala, all MPs & MLAs of @ShivSena will be contributing their one month’s salary to the Kerala Chief Minister’s Relief Fund.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 20, 2018
For the last week, our Thane city unit has been actively collecting essential food and clothing materials to be sent to Kerala pic.twitter.com/bqzABlB4z3
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.