आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशा अंबानी यांना आनंद यांनी या मंदिरात केले प्रपोज, महाबळेश्वरमध्ये आलिशान बंगला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची कन्या ईशा आणि पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचे चिरंजिव आनंद पिरामल हे दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

 

आनंद आणि ईशामध्ये मैत्री आहे. आता या मैत्रीचे रुपांतर नात्यात होणार आहे. आनंद यांनी ईशाला महाबळेश्वर येथील एका मंदिरात प्रपोज केले होते. आनंद यांच्या वडिलांचा महाबळेश्वर येथे आलिशान बंगला आहे.

 

12 वर्षांपूर्वी खरेदी केला होते ग्रीनवुड्स

- अजय पिरामल आणि त्यांची पत्नी स्वाती यांनी 2006 मध्ये हॉलिडे होमच्या रुपात महाबळेश्वर येथ ग्रीनवुड्स बंगला खरेदी केला होता.
- सांगलीचे महाराज विजय सिंग पटवर्धन यांच्या पूर्वजांनी 1862 मध्ये या बंगल्याचे बांधकाम केले होते.

- पिरामल यांनी या हेरिटेज बिल्डिंगला खरेदी करून रिस्टोअर केले होते.
- बंगला मराठा-विक्टोरियन स्टाईलमध्ये बांधण्यात आला आहे.

 

विविध फुलांनी सजला आहे ग्रीनवुड्स
- स्वाती पिरामल यांना गार्डेनिंगची आवड आहे. बंगल्याच्या चौफेर विविध फुलझाडे आहेत.
- ग्रीनवुड्स बंगल्यात ऑर्किड, लिली, आफ्रिकन डेजी, अलकेमिलिया, एस्टर, डेफोडिल, क्विंस, मांडेविला आदी व्हरायटी आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... महाबळेश्वर येथील ग्रीनवुड्‍स बंगल्याचे फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...