आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Andheri Bridge Collapse: गोखले पूल दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर (वय-36) यांचे शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास निधन झाला. मागील काही दिवसांपासून त्या कोमात होत्या. कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना काटकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

अंधेरी स्टेशनजवळील अंधेरी आणि विलेपार्लेला जोडणार्‍या गोखले पूलाचा काही भाग 3 जुलै रोजी कोसळला होता. पूलाच्या ढिगार्‍याखाली अस्मिता काटकर अडकल्या होत्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते. काटकर यांच्यासह सहा जण जखमी झाले होते.

 

मुलाला शाळेत सोडून परत येताना कोसळला ब्रिज...

अस्मिता काटकर या मुलाला शाळेत सोडून परत येताना अंधेरी आणि विलेपार्लेला जोडणारा  पादचारी पूल कोसळला. पूलाच्या ढिगार्‍याखाली त्या अडकल्या होत्या. मुलाला शाळेत सोडण्यासाठी काटकार या पुलाचा वापर करीत होत्या.

 

कूपर हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर राजेश सुखदेव यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी काटकर यांची प्राणज्योत मालवली. त्या सावंतवाडी येथील रहिवाशी होत्या. काटकर यांचे पती रिक्षा चालतात तर त्या पोळ्या लाटून संसाराला हातभार लावत होत्या. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...गोखले पूल दुर्घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...