आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai: ६५ मीटर अाधीच ब्रेक दाबल्याने अनर्थ टळला; माेटरमन सावंत यांनी सांगितला अनुभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अवघ्या काही सेकंदाचा जरी फरक पडला असता तरी गाेखले पुलाखाली लाेकल येऊन शेकडाे प्रवाशांना अापले प्राण गमवावे लागे असते. मात्र, माेटरमन चंद्रशेखर सावंत यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे माेठी मनुष्यहानी टळली. 


हा हृदयद्रावक क्षण सांगताना सावंत म्हणाले की, सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी बाेरिवली येथून चर्च गेटच्या दिशेने माझी लाेकल निघाली. अंधेरी स्थानक साेडत असताना ५० प्रतिकिलाेमीरटरचा वेग हाेता. इतक्यात मला समाेरचा पूल काेसळत असल्याचे दिसले. त्यावेळी लाेकल अाणि पूलमध्ये केवळ ६५ मीटरचे अंतर हाेते. मी इमर्जन्सी ब्रेक लावून लाेकल तातडीने थांबवली. पण काही सेकंदाचा जरी फरक पडला असता तरी माेठा अनर्थ झाला असता. पुलाचा काही भाग काेसळल्याचे पाहिल्यानंतर मी तातडीने याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली, असे सावंत यांनी सांगितले. अापण अापले कर्तव्य बजावले, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.

 

काही सेकंद उशीर झाला असता तर..

सावंत यांनी सांगितले की, काही सेकंदाचा फरक होता. पूल आणि लोकलमध्ये फक्त 60 ते 65 मीटरचे अंतर होते. आणखी काही सेंकद उशीर झाला असता तर तर अनर्थ ओढवला असता. कोसळलेला पूल पाहिल्यानंतर तातडीने याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. दरम्यान, पूल कोसळण्याच्या काही मिनिटे आधीच विरार-चर्चगेट लोकल या रुळावरून गेली होती, असेही सावंत यांनी सांगितले.

 

मोटरमनला 5 लाखांचे बक्षिस...

मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी पाच लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. रेल्वे मंत्री यांनी ट्‍विट करून ही माहिती दिली. रेल्वेमंत्र्यांनी आपल्या ट्‍विटमध्ये सांगितले की, मोटरमन सांवत यांनी दाखवल्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.  मी त्यांचे आभार मानतो.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...