आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातंग समाजावरील अन्याय थांबवा, अन्यथा आंदोलन, अण्णाभाऊ साठेंच्या सुनेचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबर्इ- राज्यभरात ठिकठिकाणी मातंग समाजावर जे अन्याय अत्याचार सुरू आहेत, ते थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अन्यथा या विराेधात राज्यभरात जनआंदोलन छेडण्याचा इशारा शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबार्इ साठे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

 
त्या म्हणाल्या, गेल्या काही महिन्यांपासून मातंग समाजावर हल्ल्यांसारख्या गंभीर घटना घडत असून महिलांना अत्याचाराला तोंड द्यावे लागत आहे. या घटना पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहेत. या घटनेच्या राज्यभरात निषेध करण्यात आला. पीडितांवर अत्याचार करणाऱ्या कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा व अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करण्यात यावे. ग्रामीण भागातील मातंग समाजावरील हल्ले सातत्याने वाढत असून त्याला शासनव्यवस्था जबाबदार आहे. अनुसूचित जाती- जमाती अत्याचार कायदा रद्द करून राज्य सरकारने जातीयवाद्यांना एक प्रकारे पाठबळ दिल्याचा अाराेप अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी या वेळी केला.  

 

राज्यभरात प्रबोधन मोर्चा   
मुख्यमंत्र्यांनी त्वरित हस्तक्षेप करून मातंग समाजावर होत असलेले हल्ले रोखून सलोखा निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा पुढील वर्षी होत असलेल्या निवडणुकीत मातंग समाज भाजपच्या विरोधात मतदान करेल. मातंग समाजातील अत्याचाराने पीडित असलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी राज्यभरात प्रबोधन मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही साठे यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...