आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शहीद कोस्तुक राणे अमर रहे, भारत माता की जय’; महाराष्ट्राच्या वीरपुत्राला अखेरचा निरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना अवघ्या २९ व्या वर्षी वीरमरण अालेलेले मेजर काैस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्या पार्थिवावर मीराराेड येथील स्मशानभूमीत अत्यंत शाेकाकुल वातावरणात गुरुवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात अाले. या वेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित हाेते. मीरा राेड, भाइंदर परिसरातील हजाराे नागरिकांनी साश्रू नयनांनी मेजर राणे यांना अखेरचा निराेप दिला. 


काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करताना राणे यांना वीरमरण अाले होते. शहिद राणे यांचे पार्थिव मुंबईत गुरुवारी सकाळी दाखल झाल्यानंतर मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनाेद तावडे यांनी विमानतळावर पार्थिवाचे दर्शन घेऊन राज्य शासनाच्यावतीने पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर शहिद राणे यांचे पार्थिव मालाड येथील सेंट्रल अाॅर्डिनन्स डेपाे आणि मीरा राेडच्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात अाले हाेते. 


शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनाी मोठी गर्दी केली होती. भावपूर्ण वातावरण, साश्रू नयनाने त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. लष्करी ट्रकवर फुलांनी सजविलेली शवपेटी हाेती.नागरिक "कौस्तुभ राणे अमर रहे'च्या उत्स्फूर्त घोषणा देत होते. 


शहीद राणे यांची अंत्ययात्रा जॉगर्स पार्क जवळील हिंदू स्मशानभूमीत पोहचल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले. आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, वरिष्ठ लष्करी अधिकारी या वेळी उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी शहीद कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे आणि मुलगा अगस्त्य हे धायमोकलून रडत होते. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...