आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • MUMBAI: राज ठाकरेंच्या घरासमोर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; 2 पानी पत्रात मांडली व्यथा Art Teacher Attempt To Suicide In Front Of Raj Thackerays Krishnkunj Banglow

MUMBAI: राज ठाकरेंच्या घरासमोर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; 2 पानी पत्रात मांडली व्यथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान 'कृष्णकुंज'समोर एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. भारत हरी गिते असे आत्महत्या कररण्‍याचा प्रयत्न करणार्‍या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षकाला रोखण्‍याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने विष प्राशन केले. त्यानंतर शिक्षकाला उपचारासाठी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलला दाखल करण्‍यात आले आहे. ही घटना आज (बुधवार) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.

 

मिळालेली माहिती अशी की, भारत गिते हे रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचे शिक्षक आहे. परंतु कॉलेज प्रशासनाने कला विभाग बंद करून आपल्यावर उपासमारीची वेळ आणली आहे. आपल्यावर अन्याय केला आहे, असा आरोप गिते यांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बंगल्यासमोर आत्महत्या करण्‍याचा प्रयत्न या शिक्षकाने केला.

 

राज यांना लिहिले 2 पानी पत्र...
राज ठाकरे हे भारत गिते यांचे आवडते नेते आहेत. गिते यांनी राज यांना 2 पानी पत्रे लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. राज यांना कलेची जाण आहे. त्यामुळे राज यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल, या उद्देशाने त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करणार असल्याचे गिते यांनी पत्रात म्हटले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... शिक्षक भारत गिते यांनी राज ठाकरे यांना लिहिलेले पत्र, जसेच्या तसे...

बातम्या आणखी आहेत...