आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया \'सोनागाच्छी\', देश-विदेशातून होते मुलींची तस्करी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्राचीन काळापासून समाजात वेश्‍या व्‍यवसाय प्रचलित आहे. काही देशात या व्‍यवसायाला कायदेशीर मान्‍यताही आहे. परंतु, भारतात देहव्रिकी म्‍हणजे गुन्‍हा आहे. असे असताना भारतातील सर्वत्र देहविक्री व्‍यवसाय राजरोसपणे सुरू आहे. एवढेच नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या रेड लाइट एरियापैकी एक एरिया पश्चिम बंगालमधील सोनागाच्छी आहे. विशेष म्‍हणजे या ठिकाणी 14 हजारांपेक्षा अधिक महिला या देहविक्री करतात. त्‍यांची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....

 

12 हजार मुली अल्‍पवयीन

येथील कुटुंखाण्यात 18 वयाखालील 12 हजार मुली काम करतात. फोटोग्राफर सुजोत्रा घोषने येथील काही निवडक फोटो क्लिक केले आहेत. कोलकातामधील या वेश्यालयावर एक सिनेमादेखील बनवण्यात आला आहे. Born Into Brothels नावाच्या या सिनेमाला ऑस्करमध्ये सन्मानित करण्यात आले होते.

 

एक महिला दिवसाकाठी कमावते फक्त 124 रुपये...

सोनागाछीमध्ये राहणाऱ्या महिला दिवसाकाठी देहविक्रीतून 124 रुपये कमवते. यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत असले, तरी त्या मागे खूप मोठे दुख: असते. त्यांनी या वेश्यावृत्तीलाच आपले जीवन मानले आहे. या परिसरात इतर सामान्य लोकांना प्रवेश नाहीये. एवढेच नाही पत्रकार किंवा फोटोग्राफर्सनादेखील सहजासहजी आत प्रवेश मिळत नाही. अनेक सामाजिक संस्था या महिलांसाठी काम करतात.एचआव्‍ही एड्स आणि इतर आजारांपासून त्‍यांना मार्गदर्शन केले जाते.

 

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पश्चिम बंगालमधील सोनागाच्छीमधील फोटोज...

बातम्या आणखी आहेत...