आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ab Tak Chhappan सिनेमाच्या स्क्रिप्ट रायटरची मुंबईत आत्महत्या, सापडली नाही सुसाइड नोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- असिस्टेंट डायरेक्टर आणि स्क्रिप्ट रायटर रवीशंकर आलोक (32) यांनी बुधवारी अपार्टमेंटच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. सिनेमे न  मिळाल्याने मागील काही दिवसांपासून ते डिप्रेशनमध्ये होते. मनोचिकित्सकाकडे त्यांच्यावर उपचारही सुरु होते. नैराश्यातून रवीशंकर यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा सुरु आहे.

 

रवीशंकर आलोक यांनी 'अब तक छप्पन' या सिनेमाने आपल्या करियरचा श्रीगणेशा केला होता. यासोबतच त्यांनी अनेक अवार्ड विनिंग सिनेमांसाठीही काम केले होते.

 

नाही सापडली सुसाइड नोट..
- मुंबईतील अंधेरी वेस्टमध्ये सेवन बंगला भागातील वसंत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्य सातव्या फ्लोअर रवीशंकर राहत होते. याच बिल्डिंगच्या छतावरून उडी घेऊन रवीशंकर यांनी आत्महत्या केली. मागील काही दिवसांपासून त्यांच्याकडे एकही काम नव्हते. त्यामुळे ते मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. घराचे भाडे देण्यासाही त्यांच्याकडे पैसे नव्हते. पो‍लिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...