आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैभव राऊतच्या घरात ATS ला आणखी सापडला मोठा शस्त्रसाठा; सुधन्वाच्या घरातून सहा हार्डडिस्क जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/पुणे- हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता वैभव राऊतच्या घरातून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आणखी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. सोबतच त्याचा साथीदार सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून सहा हार्डडिस्क लॅपटॉप, नऊ मोबाईल, अनेक सीमकार्ड, एक कार आणि मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

 

दुसरीकडे, एटीएसने नालासोपारा येथे केलेल्या कारवाईमुळे 17 ऑगस्टला गावकरी मूक मोर्चा काढणार आहेत.

 

दहशतवादविरोधी पथक गुन्हा रजिस्टर क्रमांक 11/2018 बेकायदेशिर कृत्ये प्रतिबंधका कायदा वगैरे ह्या गुन्ह्याच्या तपासात अटक करण्‍यात आलेला वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर या आरोपींची चौकशीनंतर त्यांच्या घरातून आणखी मोठा शस्त्रसाठा जप्त करण्‍यात आला आहे.

नारासोपारा येथील वैभव राऊतच्या घरातून 5 गावठी पिस्तूल, 3 अर्धवट तयार झालेल्या गावठी पिस्तूल, 9 एमएम राऊंड 11, 7.65 राऊंड 30, स्प्रींग्ज, ट्रिगर आदी शस्त्रास्त्रांचे सुटे भाग जप्त करण्‍यात आले आहेत.

 

दुसरा आरोपी सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून एक लॅपटॉप, 6 हार्डडिक्स, 5 पेनड्राईव्ह, 9 मोबाईल, अनेक सिमकार्ड्‍स, 1 वायफाय डोंगल, 1 कार, 1 मोटार सायकल व अनेक दस्ताऐवज जप्त करण्‍यात आले आहे. यावरून गोंधळेकर हा टेक्निकल एक्सपर्ट असल्याची माहिती समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...