आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11च्या हल्ल्यात गमावले आई-वडील; तब्बल 9 वर्षांनंतर भारत भेटीला आला बेबी मोशे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 चा दहशतवादी हल्ल्याच्या जखमा बर्‍या झाल्या असल्या तरी व्रण मात्र आजही प्रत्येकाच्या मनावर ताजी आहेत. 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबई शहरावर महाभयंकर हल्ला चढवला होता. 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता, तर 800 हून अधिक लोक जखमी झाले होते.

 

इस्रायलचा चिमुकला मोशे होल्त्झबर्ज यानेही या हल्ल्यात आपले आई-वडिलांना गमावले. हल्ल्याच्या वेळी मोशे अवघ्या दोन वर्षांचा होता. दहशतवाद्यांनी ज्या छाबाड हाऊसवर हल्ला केला. त्या इमारतीतून सहीसलामत बाहेर पडणाऱ्या मोजक्या लोकांपैकी तो एक होता.

 

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. नेतन्याहू आज (सोमवार) आग्य्रात आहेत. ताजमहलला भेट देऊन ते मुंबईतही येणार आहेत. यानिमित्ताने मोशेही मुंबईत दाखल झाला आहे. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी त्याचे मुंबईत जोरदार स्वागत केले. मुंबईत आल्यानंतर मोशेचे आनंद ‍व्यक्त केला आहे. मोशेसोबत त्याचे आजोबाही आहेत. मुंबई आता पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित असल्याचे मोशेचे आजोबांनी म्हटले आहे.

 

तब्बल नऊ वर्षांनंतर भारतात आलेला मोशे 17 जानेवारीला इस्रायलच्या पंतप्रधानांसह मुंबईत उपस्थित राहील. 18 जानेवारीला मोशे पंतप्रधान मोदी, पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत छाबाडा हाऊसचा दौरा करणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या वर्षी जुलै महिन्यात इस्रायलचा दौरा केला होता. यादरम्यान पंतप्रधानांनी बेबी मोशेची भेट घेतली होती. त्याला भारत भेटीचे निमंत्रणही दिले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवरील इन्फोग्राफिक्समधून पाहा... मुंबईत काय घडले होते 'त्या' काळरात्री?

बातम्या आणखी आहेत...