आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • शहीद जवानांच्या पत्नींना शेतीयोग्य जमीन मिळणार; मुख्यमंत्र्यांचा निर्णय Benefit Land Martyrs Wives Also Said CM Devendra Fadanvis

शहीद जवानांच्या पत्नींना शेतीयोग्य जमीन मिळणार; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय सैन्यातील शहिदांच्या पत्नीला 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आणखी व्यापक करून आता भारतीय सैन्यासह सशस्त्र दलातील शहीद सैनिकांच्या पत्नी अथवा कायदेशीर वारसाला तो लाभ देण्याचा निर्णय शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यामुळे जेथे पत्नी हयात नसेल तेथे कायदेशीर वारसाससुद्धा हा लाभ मिळणार आहे.

 

युद्ध, युद्धजन्य परिस्थिती तसेच देशातील सर्वच क्षेत्रांतर्गत सुरक्षेसंबंधी मोहिमेत, चकमकीत, दहशतवादी हल्ल्यात तसेच देशाबाहेरील मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या राज्यातील सैनिकांच्या पत्नीला शेतीयोग्य 2 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 20 मार्च रोजी घेतला होता.

 

पुढे या निर्णयात अशा अधिकाऱ्यांची पत्नी किंवा ‘जवान अथवा अधिकारी यांचे कायदेशीर वारस’ असा बदल समाविष्ट करण्यात आला. ही जमीन देताना ती भोगाधिकार मूल्य (अॅक्युपन्सी मूल्य न आकारता) रहित जमीन विनालिलाव देण्याची तरतूद करण्यात आली. हा निर्णय प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी शासकीय जमीन वाटपासंदर्भातील 1971 च्या नियमात बदल करणे आवश्यक आहे. त्या बदलांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता प्रदान केली. हा निर्णय भारतीय सैन्यदल किंवा सशस्त्र दलांसाठी सुद्धा लागू असेल. ही जमीन प्रदान करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असतील. यामुळे आता भारतीय सैन्य अथवा कुठल्याही सशस्त्र दलातील शहीद सैनिक अथवा अधिकाऱ्यांच्या पत्नीला किंवा वारसाला 2 हेक्टर जमीन मिळू शकणार आहे. तसेच ही जमीन त्यांना देताना कुठल्याही प्रकारचे मूल्य आकारले जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...