आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- मध्य प्रदेशातील इंदूर येथील सूर्योदय आश्रामचे संस्थापक आणि अाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या ताफ्याने मुंबईतील कुर्ल्यात गुरुवारी एका व्यक्तीला उडवल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याबाबत व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
फुल व्यावसायिक मनोज गडकरी हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोमय्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कुर्ल्यातील नेहरूनगरमधून भय्यूजी महाराज यांचा ताफा जात असताना ही घटना घडली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
भय्यूजी महाराज कुर्ल्यातील केदारनाथ मंदिरातील कार्यक्रम आटोपून सायंकाळी परतत होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील भरधाव वेगाने जाणाऱ्या एका गाडीचा धक्का रस्ता ओलांडत असलेल्या गडकरी यांना लागला. या अपघातात मनोज गडकरी हे गंभीर जखमी झाले. मात्र, त्या चालकाने गाडी न थांबवता, कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता गाडी तशीच पुढे दामटली. अज्ञात चालकाविरोधात कुर्ल्यातील नेहरुनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ती गाडी भय्यूजी महाराजांच्या ताफ्यातलीच होती, की इतर कुठल्या गाडीचा या व्यक्तीला धक्का लागला, याची खात्री पोलिस करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.