भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ / भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ राज्यात लाखाे धारकरी रस्त्यावर; गुन्हे मागे घेण्याची मागणी

चिथावणीखोर वक्तव्य करून कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविराेधात ठाेस पुरावे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले अाहे. त्यामुळे अाता भिडे गुरुजींवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी त्यांच्या लाखाे समर्थकांनी (धारकरी) बुधवारी राज्यभर सन्मान माेर्चा काढले. मुंबईत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नागपूर, नगर, अकाेला, अमरावती, बुलडाणा आदी शहरांतही अांदाेलन करुन प्रशासनाला निवेदन दिले.

Mar 29,2018 05:11:00 AM IST

पुणे- चिथावणीखोर वक्तव्य करून कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविराेधात ठाेस पुरावे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले अाहे. त्यामुळे अाता भिडे गुरुजींवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी त्यांच्या लाखाे समर्थकांनी (धारकरी) बुधवारी राज्यभर सन्मान माेर्चा काढले. मुंबईत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नागपूर, नगर, अकाेला, अमरावती, बुलडाणा आदी शहरांतही अांदाेलन करुन प्रशासनाला निवेदन दिले.

प्रकाश अांबेडकरांच्या ब्रेन मॅपिंगची मागणी
पुण्यात ३१ डिसेंबर राेजी एल्गार परिषद झाली. त्याच्या नियाेजनात अनेक नक्षली संस्थांचा सहभाग हाेता हे तपासात समाेर अाले. तिथे भडकाऊ भाषणे देणाऱ्या उमर खालिद, जिग्नेश मेवानी, बी.जे.काेळसे पाटील यांच्यावर दंगल घडवून अाणल्याचे गुन्हे दाखल करावेत. नक्षलवादी विचारसणीच्या लाेकांशी प्रकाश अांबेडकर यांचे संबंध पाहता, या सर्व दंगलीच्या पूर्वनियाेजित कटात अांबेडकरांचासुद्धा सहभाग असावा. त्यामुळे त्यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संयाेजक प्रा.पराशर माेने यांनी केली अाहे.

माझ्या मुलास एवढ्या क्रूरतेने मारले की हाडही शिल्लक राहिले नाही

विशिष्ट समाजाचा असल्याने अाणि शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला टी-शर्ट घातल्याने काेरेगाव भीमा येथील दंगलीत माझ्या मुलाला क्रूरपणे मारण्यात अाले. त्याचे हाडसुद्धा शिल्लक राहिले नाही. त्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दाेषींवर कारवाई हाेऊन त्यांना कठाेर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काेरेगावच्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडे याची अाई जनाबाई फटांगडे यांनी अांदाेलनाच्या वेळी केली.

मुख्य अाराेपीस अटक न केल्यास अांदाेलन : तेजस
मृत राहुलचा भाऊ तेजस म्हणाला, ‘जे काेणी अाराेपी असतील त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे. मात्र, अद्याप या प्रकरणातील मुख्य अाराेपींना अटक केल्याचे दिसत नाही. शासनाने त्यांना अटक करावी अाणि दाेषींवर याेग्य कारवाई करावी. अाराेपींना लवकर अटक न केल्यास अाम्हाला अांदाेलनासारखा मार्ग शाेधावा लागेल.’


सांगली शहरात बंदोबस्त
सांगली शहरात भिडेंच्या समर्थकांनी भव्य माेर्चा काढला हाेता. गुरुजींचे माेठमाेठे हाेर्डिंग घेतलेले समर्थक या माेर्चात सहभागी झाले हाेते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले.


पुण्यात ठिय्या आंदोलन

पुण्यात पाेलिसांनी माेर्चाला परवानगी नाकारली हाेती. त्यामुळे भिडे समर्थकांनी टिळक पुलाजवळील नदीपात्रात ठिय्या मांडला. भिडे व मिलिंद एकबाेटेंवरील
गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.


सोलापूरकरही रस्त्यावर

सोलापूरात महामोर्चा काढण्यात आला. संभाजी भिडे यांना न्याय मिळालाच पाहिजे, देशभक्तांच्या अटकेची मागणी करणाऱ्यांचा निषेध असो, खोटे आरोप करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात येत होत्या. या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी भगवे फेटे तर काहींनी वारकरी टोपी परिधान केली होती.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. भिडे गुरुजींना मुख्यमंत्र्यांकडून 'क्लिन चिट'... पाहा मोर्चाचा व्हिडिओ...

कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यापूर्वीच त्यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंगळवारी विधानसभेत क्लीन चिट दिली. दरम्यान, अॅट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन घेता येईल, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णयही केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केला आहे.भिडे गुरुजी यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांची लायकी नाही, असे उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. वडीलधाऱ्या असणाऱ्या गुरुजींचे आणि कोरेगाव भीमा प्रकरणानंतर बोलणे झाले, त्यावेळी बोलत असताना गुरुजी रडले, असे उदयनराजे यांनी सांगितले.
X