आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत, लवकरच मुख्य प्रवाहात सामील होतील- रावसाहेब दानवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्ष उभारणीत त्यांचा मोठा सहभाग आहे. ते पक्ष सोडणार नाहीत. काही कारणांमुळे त्यांना पदावरून दूर जावे लागले, त्यांनी स्वतःहुन पदाचा त्याग केला आहे. काही प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे. त्यापैकी बहुतांश प्रकरणातून ते बाहेर पडले आहेत. काही प्रकरणे आहेत की त्यातून ते सहीसलामत बाहेर पडतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.

 

खडसे भाजप सोडणार नाहीत..

खडसे यांना पक्ष सन्मानाने सहकार्य करण्यास तयार आहे. ज्यांनी खडसेंच्या तोंडाला कान लावले, त्यांनीच एके काळात त्यांच्यावर आरोप केले होते. खडसेंबाबत त्यांना बोलनाचा अधिकार नाही. खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते असून ते पक्ष सोडणार नाहीत, असेही रानवे यांनी सांगितले.

खडसे यांनीच विधानसभेत काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीचे वाभाडे काढले होते, आणि काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच आरोप करून खडसेंना पदावरून दूर करा, अशी मागणी लावून धरली होती. खडसेंबाबत खंत व्यक्त करून काँग्रेस राजकारण करीत आहे. स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा दानवे यांनी आरोपही केला आहे.

 

खडसे लवकरच भाजपच्या मुख्य प्रवाहात सामील होतील...
काही प्रकरणात खडसेंची चौकशी सुरु आहे. त्यातून ते सहीसलामत बाहेर पडतील आणि लवकरच ते भाजपच्या मुख्य प्रवाहात सामील होतील, असा विश्वासही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. परंतु खडसेंची चौकशी कधी पूर्ण होईल, या प्रश्नाला उत्तर देताना दानवे यांनी सांगितले की, याबाबत मुख्यमंत्रीच सांगू शकतील.

बातम्या आणखी आहेत...