आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू याच्याकडून मुंबई वाहतूक पोलिसांनी दंड वसूल केला आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याप्रकरणी कुणालवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कुणालकडून पोलिसांनी 500 रुपये दंड आकारला आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणार्या कुणालचे काही फोटो आणि दंड भरल्याची पावती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दरम्यान, अनिल कश्यप नामक सोशल मीडिया यूजरने 'ट्विटर'वर मुंबई पोलिसांना कुणालच्या काही फोटोसह टॅग केले होते. सोबतच कुणालवर पोलिस कुणाल खेमूवर दंडात्मक कारवाई करू शकतात, असेही लिहिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कुणालला ई-चालान पाठवले.
कुणालने ट्विटरवर मागितली माफी...
दुसरीकडे, कुणाल खेमू याने आपली चूक मान्य केली आहे. चुकीबद्दल त्याने ट्विटरवर माफीही मागितली आहे. दरम्यान, यापूर्वी नोव्हेंबर 2017 मध्ये अभिनेता वरुण धवन याच्यावरही मुंबई पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती. वरुण याने रहदारीच्या रस्त्यावर कार उभी करून चाहत्यांसोबत सेल्फी काढला होता. वरूणचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... वाहतुकीचे नियम तोडणारा अभिनेता कुणाल खेमूचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.