आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाने संरक्षण काढून घेतले, डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस.कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती या दोघांना अटकेपासून दिलेले संरक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी काढून घेतले. जवळपास अडीच हजार गुंतवणुकदारांच्या तब्बल २३० कोटी रुपयांच्या ठेवी थकवल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला अाहे. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठीच्या पैशाची तजवीज करण्यासाठी डीएसकेंना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देऊ केले होते. मात्र मुदतीत पैसे न भरल्यामुळे न्यायालयाने त्यांची खरडपट्टी काढली.

 

पासपोर्ट जमा करा- हायकोर्ट
डीएसकेंचे पासपोर्ट तातडीने जमा करा, अशा सूचना हायकोर्टाने सर्व विमानतळांना देण्याचे आदेश दिले आहेत. डीएसकेंनी आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा केल्याची माहिती कोर्टाला दिली. परंतु, डीएसकेंकडे एकच पासपोर्ट असेल कशावरुन? असा सवाल कोर्टाने यावेळी उपस्थित केला आहे.

 

बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीला हायकोर्टाकडून समज

हायकोर्टाने सुनावणी दरम्यान बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीला समज दिली.

तुमच्याकडे लोकांचाच पैसा आहे, हे ध्यानात ठेवा. कागदपत्रांची पूर्ण छाननी न करताच डीएसकेंना तुम्ही कर्ज देण्यास कसे तयार झालात असा सवालही कोर्टाने सोसायटीला केला.

बातम्या आणखी आहेत...